महाराष्ट्र बोर्डाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा निकाल उद्या लागणार आहे.....
यानिमित्त माझा मागील वर्षीच्या 'Day of Results' ला विद्यार्थ्यांना संबोधित करणारा संदेश नव्याने पाठवित आहे.
कृपया संदेश जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचवण्यात यावा ही विनंती...
*निर्धारक नव्हे ; तर निर्देशक....*
--गजानन देशमुख
---------------------
मित्रांनो आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातल्या अविस्मरणीय घटनांच्या यादीत जोडल्या जाणार आहे कारण आज बोर्डाचा HSC परीक्षांचा निकाल लागणार आहे जो की कित्येकांच्या जीवनात संधी आणि धोके घेऊन येतो काहींना स्वप्ने दाखवतो तर काहींच्या स्वप्नांची राख करतो .
प्रश्न हा आहे की आम्ही या निकालाला आमच्या आयुष्यात काय महत्व देतो !
सन्माननीय महामंडळाच्या प्रतिष्ठेचा मी आदर करतो पण सगळ्यात महत्वाचं वाक्य एकच लक्षात ठेवा की आजचा निकाल हा आपल्या बुद्धीमत्तेचा, आयुष्यातील यशापयशाचा किंवा तुमच्या वर्षभर केलेल्या अभ्यासाचा नसून तो केवळ प्रत्येक पेपर च्या 3 असा एकूण 18 तासांचा निकाल आहे ; हो ! "फक्त 18तासांचा !"
कदाचित तो कुणाच्या बाबतीत वर्षभराच्या मेहनतीचा अहवाल ठरेल किंवा कुणी नैतिकतेला धाब्यावर बसवून खेळलेला खेळ ठरेल!
त्यामुळे आज विजयश्री मिळविणारा आयुष्यभर प्रत्येक शिखर सर करेल किंवा आज ज्याला झुकतं माप मिळेल त्याला अपयशी असल्याचा शिक्का आयुष्यभर ललटावर मिरवावा लागेल अशतला ही भाग नाही.
या निकालामुळे तुमचं आयुष्य बदलणार नाही पण आयुष्यात होणाऱ्या बदलांची पार्श्वभूमी हा निकाल असू शकतो..
त्यामुळे आज लागणारा निकाल हा तुमच्या गुणवत्तेचा निर्देशक असेल निर्धारक नव्हे !
आपण अर्थशास्त्रात काल उपयोगिता शिकलो अगदी तीच गत निकालाची आहे. या 10-15 दिवसांमध्ये या गुणांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल पण कालांतराने यांना आजच्या दिवसा इतके महत्व नक्कीच उरणार नाही हा माझा वैय्यक्तिक अनुभव आहे..हे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की ,आजच्या भारलेल्या वातावारणाचा दबाव काही लोकांना वाटू शकतो आणि यामुळे उद्दिपित होऊन निकाल प्रतिकूल असल्यास त्या व्यक्ती स्वतःला पीडा करून घेतील ही शक्यता देखील आपल्याला नाकारता येत नाही!पण माझा सगळ्यांना आग्रह असेल की निकालाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती होऊ देऊ नका : अगदी जग्ग्ज्जेते असल्याचे भासवु नका आणि अगदी हताश देखील होऊ नका !
"Don't expect ; just accept " कारण उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे सुपूर्द करण्यापूर्वी पर्यंत आपण बदल घडवू शकत होतो मात्र तद्नंतर आपण त्यास्तव अक्षम असतो म्हणून आता वैतागून अर्थ नसेल!
आयुष्यात घडून येणार्या बदलांचा स्वीकार करा किंबहुना त्यांना सकारात्मक प्रतिभरण द्या.मार्कांमध्ये सापेक्ष चढउतार असणार आहेत आणि यश अपयश यांचे असे काही निर्धारक मानदंड अस्तित्वात नाहीत! त्यामुळे यश-अपयश हे व्यक्तिबरहुकूम बदलणारे आहे ! मी कितीही तळमळीनं सांगितलं तरी जे व्हायचं ते होणार आहे....काही लोक यशाने हुरळून जाणार आहेत आणि काही लोक निराश ही होणार आहेत. पण भावी काळासाठी माझा, जे लोक गुणांच्या निकषाने ranker आहेत त्यांच्यासाठी माझा हा संदेश असेल की , यशाला सातत्य असेल तरच जिंकण्याची मजा आहे🥇✊ ; १ वेळी तर जुगारी पण जिंकतात.....अगदी तसंच तुमचं यश हे नेहमीसाठी असलं पाहिजे, शाश्वत असलं पाहिजे! गुणांच्या दृष्टीने नाही ; पण गुणवत्तेच्या, नैतिकतेच्या दृष्टीने मात्र नक्की पाहिजे !
*पालकांना की विनंती* की कृपया निकालांतर इतरांची उदाहरणं आपल्या पाल्यांना ,टोचण्यांसारखी देऊ नका.माफ करा; मुले आपली आहेत मात्र त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे हे विसरून जाऊ नका. मुखत्वे मुलं वयाच्या या टप्प्यावर भावनिक संघर्षांचा सामना करत असतात, पौगंडावस्थेच्या या टप्प्यात त्यांचा 'स्व' विकसित होत जातानाच अशाच एखाद्या क्षुल्लक निकालामुळे आपण त्याला पार ठेचून टाकतो! मुलांना योग्य सल्ला नक्की द्या, उपदेश करा, दाखले द्या.(कृपया त्यांना समवयस्क ,परिचित अथवा नात्यातील व्यक्तींची उदाहरणं आवर्जून टाळावीत)
माझ्या पाल्याच्या निकालामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा प्रभावित होईल असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन प्राणपणाने जपणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की मुलं म्हणजे काही तुमच्या प्रतिष्ठेची साधनं नाहीत.
आता त्यांना लागलेल्या निकालाबद्दल ओरडून शक्ती खर्च न करण्यातंच खरी हुशारी !
सद्यस्थितीत एक शक्यता तर खुप भयंकर आहे की निकाला नंतर नि:संशयपणे मुलांच्या मोबाईलचा उद्धार होईल ....( एक बाब विसरून ही चालणार नाही की लाॅकडाऊन असल्याने मोबाईलचा वापर वाढला आहे किंबहुना उर्वरित पर्याय ही अत्यल्प आहेत!)
वर्षभर आपल्या पाल्यांनी शाळा, शिकवण्यांना हजेरी लावली आहे, अभ्यास केला आहे, यथाक्षमता परीक्षा ही दिली आहे; मनोरंजनापुरता केला असेल ना वापर पण दिवस-दिवस नाही हे कृपया लक्षात घ्या! विद्यार्थ्यांनीही यशस्वीतेने हुरळून जाऊ नये किंवा अपयशाने खचून जाऊ नये.
आपण उत्तीर्ण /अनुत्तीर्ण असं वर्गीकरण करू शकतो मात्र यशाला असं मोजता येत नाही!यश म्हणजे काय तर केवळ एक जय नव्हे तर सातत्यपूर्ण विजयांची अखंड श्रृंखला!
आणि अपयश म्हणजे तरी काय , तर वैफल्य, अनपेक्षित निराशा!
पण जे मला अनुकूल नाही ते प्रतिकूल आहे अशातलाही भाग नसतो.
"Let not failure to be the obstacle in your successful new beginning"
म्हणून ज्यांना वाटेल की आपण हरलो आहेत त्यांनी फक्त इतकंच लक्षात ठेवा की राखेतून पक्षी जसा पुन्हा उठतो अगदी त्याच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तुम्ही पुन्हा उभारी घ्यावी....
आपणा सर्वांच्या भावी काळासाठी माझ्या सदिच्छा. 💐💐😊😊
-गजानन संजय देशमुख©